Showing posts with label Fort in Maharahshtra. Show all posts
Showing posts with label Fort in Maharahshtra. Show all posts

Sunday, 5 March 2023

Shivaji Raje Fort In Maharashtra

 


रायगड :-

* किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग उंची : २९०० फुट * जिल्हा : रायगड* डोंगररांग: सह्याद्री

महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटनेचा साक्षीदार- शिवराज्यभिषेकाचा सुवर्णक्षण असलेला गड म्हणजे रायगड होय, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग होय. महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. हा किल्ला आहे.

रायगडाचे प्राचीन नाव रायरी हे होते. रायगडला रायरी इस्लामगड, नंदादीप, जंबुदिप तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड रेडी, शिवलंका राहीर आणि पूर्वेकडील जिब्रालटर या १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे.

रायगडावर महादरवाजा, चोंडचिडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ पालखी दरवाजा, मेगा दरवाजा, राजभवन रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिर्काई देऊळ, जगदीश्वर मंदिर, मारुतीची मुर्ती, महाराजांची समाधी, आहे. रायगडावर जाण्यासाठी पायी २ तास वेळ लागतो. आता रोपवेची सुविधा आहे.

प्रतापगड:-

* किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग उंची ३५५६ फुट * जिल्हा : सातारा डोंगररांग: सह्याद्री

अफजलखानाचा वध म्हटला की, डोळ्यासमोर उभा राहतो. तो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वराच्या पश्चिमेस असणारा प्रतापगड ! प्रतापगडाजवळ कोयनेच्या काठी प्रसिध्द असे जावळीचे खोरे आहे.

प्रतापगड हा सुरुवातीला "भोरप्याचा डोंगर" म्हणून ओळखला जायचा अफजलखानाचा वध नंतर शिवाजी महाराजांनी हा पूर्णपणे बांधून त्यांचे नांव प्रतापगड ठेवले. या गडाचे वैशिष्ट्ये म्हणजे गडाचा मुख्यदरवाजा आजही सुर्योदयाला उघडतो व . सुर्यास्ताला बंद होतो शिवाजी राजांनी बांधलेले श्री भवानी मंदिर आणि अफजलखानाचा वध यामुळे हा किल्ला प्रसिध्द आहे.

प्रतापगडावर हस्तकला केंद्र, अफजलखानाची कबर, टेहळणी बुरुज, महादरवाजा रहाट तलाव, गडाचे मुख्य आकर्षण श्री भवानी मंदिर, संस्कृतीदर्शन संग्रहालय, हनुमान मंदिर, सदर, शिवाजी पुतळा आदि पाहण्यासाठी ठिकाणे आहेत.

पोलादपुर ते महाबळेश्वर या रस्त्यावर वाडा हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासुन गडापर्यंतचे अंतर ४ कि.मी. आहे. शेवटपर्यंत डांबरी रस्ता असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस व खाजगी वाहनांनी गडावर जाता येते.


पुरंदर:-

* किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग उंची: १५०० फुट *जिल्हा : पुणे डोंगररांग: सह्याद्री

आल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी, मध्ये वाहतो कहा ! पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा', असे वर्णन असलेला किल्ला म्हणजे किल्ले पुरदर होय. पुरंदर म्हणजे इंद्र ! ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर पुण्याच्या अग्नेय दिशेला अंदाजे २० मैलावर तर सायवडच्या नैऋत्येला ६ मैलांवर आहे.

पुराणात याचे नाव इंद्रनील पर्वल आहे. पुरंदर किल्ल्यावर बिनी दरवाजा, पुरंदेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, खंदकडा, पद्यावती तळे, शेंदऱ्या बुरुज केदारेश्वर, पुरंदर माची, भैरवखिंड, वीर मुरारबाजीचा पुतळा आदी ठिकाने पाहण्यासारखी आहेत.

संभाजी राजांचा जन्म याच पुरंदर किल्ल्यावर झाला. १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगा समवेत युध्द झाले. दुदैवाने मुरारबाजी पडले आणि त्याचबरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान ऐकून महाराजांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे केले. ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. यात २३ किल्ले राजांनी मोगलांना दिले.



राजगड:-

* किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग उंची १३९४ फुट * जिल्हा : पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असलेला राजगड पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आणि भोरच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर आहे. राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे.

राजगडाला पूर्वीचे नाव मुरंबदेव होते हा किल्ला बहमनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जातो राजगडावर पद्मावती तलाव रामेश्वर मंदिर, दरवाजा, गंजवणे दरवाजा, पद्मावती माची, पद्मावती मंदिर, संजीवनी माची आळ दरवाजा, सुवेळा माची, काळेश्वरी बुरूज आणि परिसर बाले किल्ला आदि पाहण्यासाठी ठिकाणे आहेत.

गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत तसेच गडावर जाण्यासाठी तीन तास लागतात.


शिवनेरी:-

: किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग उंची: ३५०० फुट * जिल्हा : पुणे डोंगररांग : नानेघाट

महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला होय. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ आहे. जुन्नरमध्ये शिरताच शिवनेरीचे दर्शन होते.

राजमाता जिजाऊने शिवनेरी गडावरील श्री भवानी शिवाई देवीस नवस केला की, जर मला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन. या किल्ल्यावर जिजाऊंना शके १५५३ मध्ये वैशाख इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि इ.स. १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. इ.स. १६५० मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीरखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

 शिवनेरी गडावर शिवाई देवींचे मंदिर, अंबरखाना, कोळी चौथरा, इदगा, शिवकुंज, कमानी, मशीद, शिवजन्मस्थान इमारत, बदामी पाण्याचे ठांक आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

शिवनेरी किल्ल्लावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात, गडावर जाण्सासाठी साखळीच्या मार्गे पाऊणतास लागतो तर सात दरवाजामार्ग दीड तास लागते.

राजमाता जिजाबाई व शिवाजी शुध्द पंचमीला पुत्र झाला आणि त्यांचे नाव शिवाजी ठेवले.



Saturday, 4 March 2023

MAHARASHTRA FORT INFORMATION

 

विजयदुर्ग :-

* किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग * जिल्हा : सिंधुदूर्ग

अजिंक्य दुर्ग "विजयदुर्ग " शिलाहार राजाच्या कारकिर्दीत म्हणजे इसवी सन ११९३ ते १२०५ या कालावधीत बांधला गेला.

१६५३ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग अदिलशहाकडून जिंकून घेतला १६९८ साली कान्होजी आंग्रे हे आरमाराचे प्रमुख झाले विजयदुर्गावर जिवीचा दरवाजा तटबंधी खलबतखान, गणेश बुरुज, राम बुरूज, हनुमंत बुरुज, शिवाजी बुरुज, तोफेची जागा, भवानी मातेचे मंदिर, साहेबाचे ओटे आदि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

सन १९९८ साली खग्रास सूर्यग्रहणाचे निरीक्षण करण्सासाठी अमेरिकन शास्त्रज्ञ लॉकीअरश्वास आला होता. विजयदुर्गाच्या तिनही बाजूंनी समुद्र होता तर एका बाजुला दलदलची होती.

विजयदुर्गाच्या इतिहासातील एक अन्यनसाधारण गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या उत्तरेकडील समुद्रात १०० ते १५० फुट अंतरावर पाण्याखाली एक तटबंदी आढळली आहे. विजयदुर्ग हा जलदुर्ग असल्यामुळे पावसाळ्या व्यतिरिक्त इतर मोसमातच जाणे सोयीचे आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सिंधुदूर्ग:-

* किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग

* जिल्हा : सिंधुदू

सागरी दुर्गाचा राजा | स्वराज्याच्या सागरी सामर्थ्याचा सच्चा साथीदार म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग होय । महाराष्ट्राला लाभलेली सातशे किलोमीटरची किनारपट्टी बळकट करण्यासाठी आरमार आवश्यक होते, ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे कळुन चुकलेल्या  शिवरायांनी स्वराज्याच्या संरक्षाणार्थ सिंधुदूर्गांच्या बांधणीच्यावेळी शिवराय तेथे होते.

शिवाजी राजांच्या हाताचा आणि पायांचा ठसा चुन्यात घेण्यात आला. आजही हे ठसे सिंधुदूर्गाचे हृदयस्थान बनुन राहिले आहेत. शिवरायांच्या कायमस्वरूपी स्पर्शाने पावन झालेला सिंधुदूर्ग अर्थाने शिवरायांच्या सागरी साम्राजाचा राज्याचा राजा ठरला.

शिवराजेश्वरांचे मंदिर गोड्या पाण्यासाठी विहिरी, राणीची वेळा, मोरियांचा धोंडा आदि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


पन्हाळगड - विशालगड :-

* किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा कोल्हापुर

छत्रपती शिवाजी राजे, संभाजी राजे, रणरागिणी ताराबाई या सारख्या पराक्रमी व्यक्तीच्या काही महत्वपूर्ण प्रसंग या गडावर घडल्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या हा गड अतिशय महत्वाचा मानला जातो.

पन्हाळगड हा शिवरायांच्या काळात नावारूपाला आला. २ मार्च १६५० ला महाराज पन्हाळ्यावर आले. त्याच काळी आदिलशहाने सिध्दी जोहरले १५ हजार फौजेनिशी पन्हाळ्यास वेढा दिला. पाऊस आला तरी वेढा दिला झाला नाही.

१२ जुलै १६६० आषाढ वद्य प्रतिदेच्या पहिल्या प्रहरी शिवराय १ हजार पायदळ, २ पालख्यांसह राजदंडीहून निघाले. त्यातील एका पालखी मध्ये शिवा काशिद होता. शिवाजी महाराज समजून शिवा काशिदला पकडले आणि ओळखला गेला आणि मारला गेला.

तो पर्यंत महाराज गहराई पठार पार करून कुवार खिंडीत उतरले होते. महाराज पांढरपाणी येथे पोहचतात न पोहचतात तिथे शत्रुचे घोडे येवून पोहचले. ते विशालगडकडे जाणाऱ्या घोडखिंडीत उतरले.

या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सैन्याने त्यांच्यावर वार करून त्यांना ठार मारले. घोडखिंड, पावनखिंड झाली. हे युध्द सुरु असतांना महाराजांनी विशाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेढ्याला भेदून गडावर प्रवेश केला.

या गडावर शिवमंदिर, ताराबाई राजवाडा, सज्जाकोठी, वाघ दरवाजा, दुतोंडी दौलती-पुसारी बुरुज, अंबरखाना, दारुगोळा कोठार तीन दरवाजा व चार दरवाजा, महालक्ष्मी मंदिर, बाजीप्रभूचा पुतळा, साधोबा दर्गा, नागझरी, पराशर गुहा, धर्मकोठी, रेडेमहल, कलावंतीण महल, मोरोपंत ग्रंथालय या शिवाय संभाजी, हरि हरेश्वर, विठ्ठल ही मंदिरे इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 सज्जनगड:-

* किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग उंची ३३५० फुट * जिल्हा : सातारा डोंगररांग सहाद्री

"सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मांदार श्रृंगापुरी । नाम सज्ज जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी । राकेताधिपती कपि भगवती, जे देव ज्याचे शिरी । येथे जागृत रामदास विलसे, जो या जना उध्दरी ॥.

या प्रमाणे अनंत कवींनी ज्या पावन भुमीचे अतिशय उत्तम वर्णन केले आहे अशी भुमी म्हणजे सातारा शहराच्या नैऋत्येस उभा अवध्या १० कि.मी अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात उभा असलेला समर्थ रामदासाच्या वास्तव्याने पावन झालेला सज्जनगड होय.

इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडुन जिंकुन घेतला प्राचीन काळी या डोंगरावर आश्रालायन ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे या किल्ल्याला आश्रालायनगड म्हटले जायचे सज्जनगडावर छत्रपती शिवाजी महाराज व्दार, समर्थव्दार, रामघळ घोडाळे तळे, आंग्लाई देवीचे मंदिर, ध्वजस्तंभ, सोनाळे तळे, मारुतीचे मंदिर, श्रीधर कुटी आश्रम, श्रीरामाचे मंदिर, समर्थचा मठ ब्रह्मपिसा मंदिर आदि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.

सज्जनगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक गाडी मार्ग आहे गडावर जाण्यासाठी परळी गावातुन पायऱ्यांनी १ तास लागतो.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सुधागड:-

* किल्लाचा प्रकार : गिरीदुर्ग उंची : ५९० मीटर * जिल्हा : रायगड डोंगररांग : लोणावळा

भोर संस्थानावे वैभव असलेला सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारे करी, १६४८ साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूर हे गाव आहे. याच गावात संभाजी महाराज व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती.

ठाकुर वाडी अथवा दर्यागावातून गडावार जाता येते. गडावर भोराई देवीचे मंदिर, पंत सचिवांचा वाडा पश्चिमेकडील पठार, महादरवाजा, शिवमंदिर, विशाल कोठारे, बालते गडे, गोमुख असलेले टोके, पूर्वेकडील बुरुज चोर वाट, बांधीव टाळी.

श्री भोराई देवीची स्थापना भृग ऋषीनी केला आहे. देवोळा भृगअंबा, भोरांबा अशी नावे आहेत. पंत सचिवानी या मंदिराचे सभागृह इ.स. १७५० मध्ये बांधुन पुर्ण केले. सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. येथील ठाणाळे लेणी २२०० वर्षापूर्वीची आहेत. धोंडसे गावातून जाण्यासाठी ३ तास लागतात.