Headlines
Loading...

 

विजयदुर्ग :-

* किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग * जिल्हा : सिंधुदूर्ग

अजिंक्य दुर्ग "विजयदुर्ग " शिलाहार राजाच्या कारकिर्दीत म्हणजे इसवी सन ११९३ ते १२०५ या कालावधीत बांधला गेला.

१६५३ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग अदिलशहाकडून जिंकून घेतला १६९८ साली कान्होजी आंग्रे हे आरमाराचे प्रमुख झाले विजयदुर्गावर जिवीचा दरवाजा तटबंधी खलबतखान, गणेश बुरुज, राम बुरूज, हनुमंत बुरुज, शिवाजी बुरुज, तोफेची जागा, भवानी मातेचे मंदिर, साहेबाचे ओटे आदि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

सन १९९८ साली खग्रास सूर्यग्रहणाचे निरीक्षण करण्सासाठी अमेरिकन शास्त्रज्ञ लॉकीअरश्वास आला होता. विजयदुर्गाच्या तिनही बाजूंनी समुद्र होता तर एका बाजुला दलदलची होती.

विजयदुर्गाच्या इतिहासातील एक अन्यनसाधारण गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या उत्तरेकडील समुद्रात १०० ते १५० फुट अंतरावर पाण्याखाली एक तटबंदी आढळली आहे. विजयदुर्ग हा जलदुर्ग असल्यामुळे पावसाळ्या व्यतिरिक्त इतर मोसमातच जाणे सोयीचे आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सिंधुदूर्ग:-

* किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग

* जिल्हा : सिंधुदू

सागरी दुर्गाचा राजा | स्वराज्याच्या सागरी सामर्थ्याचा सच्चा साथीदार म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग होय महाराष्ट्राला लाभलेली सातशे किलोमीटरची किनारपट्टी बळकट करण्यासाठी आरमार आवश्यक होते, ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे कळुन चुकलेल्या  शिवरायांनी स्वराज्याच्या संरक्षाणार्थ सिंधुदूर्गांच्या बांधणीच्यावेळी शिवराय तेथे होते.

शिवाजी राजांच्या हाताचा आणि पायांचा ठसा चुन्यात घेण्यात आला. आजही हे ठसे सिंधुदूर्गाचे हृदयस्थान बनुन राहिले आहेत. शिवरायांच्या कायमस्वरूपी स्पर्शाने पावन झालेला सिंधुदूर्ग अर्थाने शिवरायांच्या सागरी साम्राजाचा राज्याचा राजा ठरला.

शिवराजेश्वरांचे मंदिर गोड्या पाण्यासाठी विहिरी, राणीची वेळा, मोरियांचा धोंडा आदि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


पन्हाळगड - विशालगड :-

* किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा कोल्हापुर

छत्रपती शिवाजी राजे, संभाजी राजे, रणरागिणी ताराबाई या सारख्या पराक्रमी व्यक्तीच्या काही महत्वपूर्ण प्रसंग या गडावर घडल्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या हा गड अतिशय महत्वाचा मानला जातो.

पन्हाळगड हा शिवरायांच्या काळात नावारूपाला आला. मार्च १६५० ला महाराज पन्हाळ्यावर आले. त्याच काळी आदिलशहाने सिध्दी जोहरले १५ हजार फौजेनिशी पन्हाळ्यास वेढा दिला. पाऊस आला तरी वेढा दिला झाला नाही.

१२ जुलै १६६० आषाढ वद्य प्रतिदेच्या पहिल्या प्रहरी शिवराय हजार पायदळ, पालख्यांसह राजदंडीहून निघाले. त्यातील एका पालखी मध्ये शिवा काशिद होता. शिवाजी महाराज समजून शिवा काशिदला पकडले आणि ओळखला गेला आणि मारला गेला.

तो पर्यंत महाराज गहराई पठार पार करून कुवार खिंडीत उतरले होते. महाराज पांढरपाणी येथे पोहचतात पोहचतात तिथे शत्रुचे घोडे येवून पोहचले. ते विशालगडकडे जाणाऱ्या घोडखिंडीत उतरले.

या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सैन्याने त्यांच्यावर वार करून त्यांना ठार मारले. घोडखिंड, पावनखिंड झाली. हे युध्द सुरु असतांना महाराजांनी विशाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेढ्याला भेदून गडावर प्रवेश केला.

या गडावर शिवमंदिर, ताराबाई राजवाडा, सज्जाकोठी, वाघ दरवाजा, दुतोंडी दौलती-पुसारी बुरुज, अंबरखाना, दारुगोळा कोठार तीन दरवाजा चार दरवाजा, महालक्ष्मी मंदिर, बाजीप्रभूचा पुतळा, साधोबा दर्गा, नागझरी, पराशर गुहा, धर्मकोठी, रेडेमहल, कलावंतीण महल, मोरोपंत ग्रंथालय या शिवाय संभाजी, हरि हरेश्वर, विठ्ठल ही मंदिरे . ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 सज्जनगड:-

* किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग उंची ३३५० फुट * जिल्हा : सातारा डोंगररांग सहाद्री

"सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मांदार श्रृंगापुरी नाम सज्ज जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी राकेताधिपती कपि भगवती, जे देव ज्याचे शिरी येथे जागृत रामदास विलसे, जो या जना उध्दरी .

या प्रमाणे अनंत कवींनी ज्या पावन भुमीचे अतिशय उत्तम वर्णन केले आहे अशी भुमी म्हणजे सातारा शहराच्या नैऋत्येस उभा अवध्या १० कि.मी अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात उभा असलेला समर्थ रामदासाच्या वास्तव्याने पावन झालेला सज्जनगड होय.

.. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडुन जिंकुन घेतला प्राचीन काळी या डोंगरावर आश्रालायन ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे या किल्ल्याला आश्रालायनगड म्हटले जायचे सज्जनगडावर छत्रपती शिवाजी महाराज व्दार, समर्थव्दार, रामघळ घोडाळे तळे, आंग्लाई देवीचे मंदिर, ध्वजस्तंभ, सोनाळे तळे, मारुतीचे मंदिर, श्रीधर कुटी आश्रम, श्रीरामाचे मंदिर, समर्थचा मठ ब्रह्मपिसा मंदिर आदि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.

सज्जनगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक गाडी मार्ग आहे गडावर जाण्यासाठी परळी गावातुन पायऱ्यांनी तास लागतो.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सुधागड:-

* किल्लाचा प्रकार : गिरीदुर्ग उंची : ५९० मीटर * जिल्हा : रायगड डोंगररांग : लोणावळा

भोर संस्थानावे वैभव असलेला सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारे करी, १६४८ साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूर हे गाव आहे. याच गावात संभाजी महाराज औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती.

ठाकुर वाडी अथवा दर्यागावातून गडावार जाता येते. गडावर भोराई देवीचे मंदिर, पंत सचिवांचा वाडा पश्चिमेकडील पठार, महादरवाजा, शिवमंदिर, विशाल कोठारे, बालते गडे, गोमुख असलेले टोके, पूर्वेकडील बुरुज चोर वाट, बांधीव टाळी.

श्री भोराई देवीची स्थापना भृग ऋषीनी केला आहे. देवोळा भृगअंबा, भोरांबा अशी नावे आहेत. पंत सचिवानी या मंदिराचे सभागृह .. १७५० मध्ये बांधुन पुर्ण केले. सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. येथील ठाणाळे लेणी २२०० वर्षापूर्वीची आहेत. धोंडसे गावातून जाण्यासाठी तास लागतात.


0 Comments: