Headlines
Loading...
Benifits of Eating black currants on an empty stomach

Benifits of Eating black currants on an empty stomach

 
उपाशी पोटी काळे मनुके खा, ह्रदय विकार टाळा!!

Eat black currants on an empty stomach, avoid heart disease!!

काळी द्राक्षे ही आयुर्वेदानुसार औषधी श्रेष्ठ मानली जातात. काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळे मनुकेही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात.

हे काळे मनुके उपाशी पोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे काळे मनुके नियमित खाल्ल्याने हृदय विकारापासून मुक्तता मिळवता येते.

Black grapes are considered medicinal and superior according to Ayurveda. Black grapes are processed and dried to make their raisins. Black currants are also rich in nutrients.

Eating these black currants on an empty stomach has many benefits. One of the biggest benefits is that eating black currants regularly can help you get rid of heart disease.


काळ्या मनुक्यात एन्थोकाइनिन्स (anthocyanins), पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, गामा-लिनोलेनिक एसिड (GLA), पोटशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात. काळ्या मनुक्यांमुळे रक्त प्रवाह वाढतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच काळे मनुके हे हृदय, डोळे आणि किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Black currant contains many nutrients like anthocyanins, polyphenols, antioxidants, vitamin C, gamma-linolenic acid (GLA), potassium, iron, magnesium, phosphorus. Blackcurrant increases blood flow, boosts immunity. Black currants are also beneficial for heart, eye and kidney health.

जाणून घ्या फायदे... Know the benefits...

1) ह्रदय विकाराचा धोका कमी करते : Reduces the risk of heart disease:

काळ्या मनुक्यात हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पोटॅशियम हृदयाला बळ देते हृदय विकारांचे प्रमाण कमी करते. याशिवाय काळ्या मनुकात असणाऱ्या Resveratrol ह्या घटकामुळे रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होतो, रक्तात गुठळ्या होत नाही, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होत असल्याने काळ्या मनुकामुळे हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

Blackcurrants are high in potassium which is good for heart health. Potassium strengthens the heart and reduces the incidence of heart disorders. Apart from this, the Resveratrol component in black currant improves blood flow, prevents blood clots, keeps blood pressure under control and reduces bad cholesterol in the blood, thus black currant helps reduce the risk of heart disease.

2) रक्तदाब नियंत्रित ठेवते : Controls blood pressure

काळ्या मनुकात पोटॅशियम आणि GLA चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. दररोज काळ्या मनुका खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. हाय ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक (पक्षाघात) आणि किडन्या निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक असते.

Blackcurrants are high in potassium and GLA. It helps in controlling blood pressure. Eating black currants daily helps control blood pressure. High blood pressure increases the risk of heart attack, stroke (stroke) and kidney failure. So, it is necessary to keep blood pressure under control.

3) हिमोग्लोबिन रक्त वाढवते : Increases haemoglobin and blood

काळ्या मनुक्यात लोह इतर जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. यासाठी 10 ते 12 काळ्या मनुका वाटीभर पाण्यात भिजत घालून त्यात थोडासा लिंबूरस घालावा. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले मनुके चावून खावेत. यामुळे रक्तारील हिमोग्लोबिन वाढते त्याचबरोबर रक्त शुद्ध होते आणि रक्ताचे प्रमाणही वाढते.

Black currants are rich in iron and other vitamins. It helps to increase the haemoglobin in the blood. For this soak 10 to 12 black currants in a bowl of water and add a little lemongrass to it. The next morning, chew the soaked raisins. This increases the haemoglobin in the blood as well as purifies the blood and increases the volume of the blood.

4) डोळ्यांचे आरोग्य सुधारते : Improves eye health

काळ्या मनुकामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे Lutein आणि Zeaxanthin हे घटक असतात. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय यामुळे रेटिनामध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होत नाही त्यामुळे अकाली अंधत्व येण्यापासून बचाव होतो.

Blackcurrants contain Lutein and Zeaxanthin which are beneficial for eye health. It helps in maintaining healthy eyesight. In addition, it prevents oxidative damage to the retina, thereby preventing premature blindness.

5) डायबेटीससाठी उत्तम : Best for Diabetes:

काळ्या मनुकातील Pterostilbene हा घटक डायबेटीसमध्ये उपयुक्त ठरतो. यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते. शिवाय काळ्या मनुकांचा Glycemic index 70 पेक्षाही कमी असल्यामुळे ते मधुमेही रुग्णांसाठी योग्य ठरतात.

Pterostilbene in black currant is useful in diabetes. This helps in controlling blood sugar. Moreover, since the glycaemic index of black currant is less than 70, it is suitable for diabetic patients.

6) अशक्तपणा दूर होतो : The weakness is removed

दररोज सकाळी भिजलेले काळे मनुका खाल्ल्यामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-K, व्हिटॅमिन-A, विविध मिनरल्स यासारखे अनेक पोषकघटक असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Eating soaked black currants every morning helps in curing anaemia. It contains many nutrients like vitamin C, vitamin K, vitamin A, various minerals which help in increasing immunity.

7) पोट साफ होते : Cleans the stomach

काळ्या मनुका सारक गुणांच्या असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. यासाठी 10 ते 12 मनुका पाण्यात भिजवून रात्री खाल्यास सकाळी पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होते.

Black currants have similar qualities. It helps in clearing the stomach. For this, if you soak 10 to 12 raisins in water and eat them at night, it clears your stomach in the morning and relieves constipation.

8) पित्त कमी करते : Reduces bile

काळ्या मनुका ह्या पित्तशामक गुणांच्या असतात. त्यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते. ऍसिडिटी किंवा आम्लपित्ताचा त्रास असल्यास दररोज सकाळी भिजलेले काळे मनुका खाणे उपयुक्त ठरते.

Black currants have choleretic properties. It helps in reducing pitta. If you suffer from acidity or heartburn, eating soaked black raisins every morning is helpful.

9) मेंदूसाठी उपयुक्त : Good for the brain

काळे मनुका खाण्यामुळे मेंदू तल्लख होऊन स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. मानसिक तणाव, नैराश्य दूर करण्यासही काळ्या मनुका उपयुक्त ठरतात.

Consuming black currants helps improve memory and concentration by making the brain brighter. Black currants are also useful in relieving mental stress and depression.

10) वंध्यत्व समस्येवर उपयुक्त : Useful in infertility problem

काळ्या मनुका वृष्य गुणांच्या असल्यामुळे पुरुषांमध्ये शुक्रधातुचे प्रमाण वाढवतात तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या विकारात उपयुक्त ठरतात. काळ्या मनुका नियमित खाण्यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. पाळीच्या वेळी रक्त जास्त जाणे, अशक्तपणा येणे, स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी होणे यासारख्या समस्या दूर होतात.

Due to the Taurus qualities, black currant increases sperm count in men and is useful in uterine disorders in women. Regular consumption of black currant relieves menstrual complaints. Problems like bleeding during menstruation, anaemia, decrease in haemoglobin in women are eliminated.

काळे मनुके कसे खावे...? How to eat black currants...?

सुक्या मेव्यातील काळ्या मनुका तशाही खाऊ शकतो किंवा 10 ते 12 काळ्या मनुका रात्री वाटीभर पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले मनुका उपाशीपोटी खाणे जास्त लाभदायी ठरते.

Dried black currants can be eaten alone or soaking 10 to 12 black currants overnight in a bowl of water is more beneficial to eat on an empty stomach the next morning.


0 Comments: