Headlines
Loading...
Shivaji Raje Fort In Maharashtra

Shivaji Raje Fort In Maharashtra

 


रायगड :-

* किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग उंची : २९०० फुट * जिल्हा : रायगड* डोंगररांग: सह्याद्री

महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटनेचा साक्षीदार- शिवराज्यभिषेकाचा सुवर्णक्षण असलेला गड म्हणजे रायगड होय, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग होय. महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. हा किल्ला आहे.

रायगडाचे प्राचीन नाव रायरी हे होते. रायगडला रायरी इस्लामगड, नंदादीप, जंबुदिप तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड रेडी, शिवलंका राहीर आणि पूर्वेकडील जिब्रालटर या १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे.

रायगडावर महादरवाजा, चोंडचिडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ पालखी दरवाजा, मेगा दरवाजा, राजभवन रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिर्काई देऊळ, जगदीश्वर मंदिर, मारुतीची मुर्ती, महाराजांची समाधी, आहे. रायगडावर जाण्यासाठी पायी तास वेळ लागतो. आता रोपवेची सुविधा आहे.

प्रतापगड:-

* किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग उंची ३५५६ फुट * जिल्हा : सातारा डोंगररांग: सह्याद्री

अफजलखानाचा वध म्हटला की, डोळ्यासमोर उभा राहतो. तो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वराच्या पश्चिमेस असणारा प्रतापगड ! प्रतापगडाजवळ कोयनेच्या काठी प्रसिध्द असे जावळीचे खोरे आहे.

प्रतापगड हा सुरुवातीला "भोरप्याचा डोंगर" म्हणून ओळखला जायचा अफजलखानाचा वध नंतर शिवाजी महाराजांनी हा पूर्णपणे बांधून त्यांचे नांव प्रतापगड ठेवले. या गडाचे वैशिष्ट्ये म्हणजे गडाचा मुख्यदरवाजा आजही सुर्योदयाला उघडतो . सुर्यास्ताला बंद होतो शिवाजी राजांनी बांधलेले श्री भवानी मंदिर आणि अफजलखानाचा वध यामुळे हा किल्ला प्रसिध्द आहे.

प्रतापगडावर हस्तकला केंद्र, अफजलखानाची कबर, टेहळणी बुरुज, महादरवाजा रहाट तलाव, गडाचे मुख्य आकर्षण श्री भवानी मंदिर, संस्कृतीदर्शन संग्रहालय, हनुमान मंदिर, सदर, शिवाजी पुतळा आदि पाहण्यासाठी ठिकाणे आहेत.

पोलादपुर ते महाबळेश्वर या रस्त्यावर वाडा हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासुन गडापर्यंतचे अंतर कि.मी. आहे. शेवटपर्यंत डांबरी रस्ता असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस खाजगी वाहनांनी गडावर जाता येते.


पुरंदर:-

* किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग उंची: १५०० फुट *जिल्हा : पुणे डोंगररांग: सह्याद्री

आल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी, मध्ये वाहतो कहा ! पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा', असे वर्णन असलेला किल्ला म्हणजे किल्ले पुरदर होय. पुरंदर म्हणजे इंद्र ! ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर पुण्याच्या अग्नेय दिशेला अंदाजे २० मैलावर तर सायवडच्या नैऋत्येला मैलांवर आहे.

पुराणात याचे नाव इंद्रनील पर्वल आहे. पुरंदर किल्ल्यावर बिनी दरवाजा, पुरंदेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, खंदकडा, पद्यावती तळे, शेंदऱ्या बुरुज केदारेश्वर, पुरंदर माची, भैरवखिंड, वीर मुरारबाजीचा पुतळा आदी ठिकाने पाहण्यासारखी आहेत.

संभाजी राजांचा जन्म याच पुरंदर किल्ल्यावर झाला. १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगा समवेत युध्द झाले. दुदैवाने मुरारबाजी पडले आणि त्याचबरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान ऐकून महाराजांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे केले. ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. यात २३ किल्ले राजांनी मोगलांना दिले.



राजगड:-

* किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग उंची १३९४ फुट * जिल्हा : पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असलेला राजगड पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आणि भोरच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर आहे. राजगडाला तीन माच्या बालेकिल्ला आहे.

राजगडाला पूर्वीचे नाव मुरंबदेव होते हा किल्ला बहमनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जातो राजगडावर पद्मावती तलाव रामेश्वर मंदिर, दरवाजा, गंजवणे दरवाजा, पद्मावती माची, पद्मावती मंदिर, संजीवनी माची आळ दरवाजा, सुवेळा माची, काळेश्वरी बुरूज आणि परिसर बाले किल्ला आदि पाहण्यासाठी ठिकाणे आहेत.

गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत तसेच गडावर जाण्यासाठी तीन तास लागतात.


शिवनेरी:-

: किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग उंची: ३५०० फुट * जिल्हा : पुणे डोंगररांग : नानेघाट

महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला होय. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ आहे. जुन्नरमध्ये शिरताच शिवनेरीचे दर्शन होते.

राजमाता जिजाऊने शिवनेरी गडावरील श्री भवानी शिवाई देवीस नवस केला की, जर मला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन. या किल्ल्यावर जिजाऊंना शके १५५३ मध्ये वैशाख .. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि .. १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. .. १६५० मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीरखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

 शिवनेरी गडावर शिवाई देवींचे मंदिर, अंबरखाना, कोळी चौथरा, इदगा, शिवकुंज, कमानी, मशीद, शिवजन्मस्थान इमारत, बदामी पाण्याचे ठांक आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

शिवनेरी किल्ल्लावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात, गडावर जाण्सासाठी साखळीच्या मार्गे पाऊणतास लागतो तर सात दरवाजामार्ग दीड तास लागते.

राजमाता जिजाबाई शिवाजी शुध्द पंचमीला पुत्र झाला आणि त्यांचे नाव शिवाजी ठेवले.



0 Comments: