
सकाळी अनुशापोटी गूळ फुटाणे खाल्ल्याने काय होईल
सकाळी उठल्यानंतर अनुशापोटी म्हणजे काहीही न खाता जर आपण गूळ आणि फुटाणे खाल्ले तर
त्याचे कोणकोणते फायदे आपल्याला मिळू शकतात.
मित्रांनो आपल्याला माहीत असेलच की भारतीय संस्कृतीमध्ये अनेक देवीदेवतांना प्रसाद म्हणून गूळ आणि फुटाणे
अर्पण केले जायचे आणि लोकसुद्धा याचे नियमितपणे सेवन करायचे.आणि त्याचा परिणाम म्हणून,या लोकांना
दीर्घायुष्य लाभायचं.अनेक आजारांपासून या लोकांचा बचाव व्हायचा.आजारांचं प्रमाण कमी असायचं मात्र
कालांतराने गूळ तर आता नाहीसा झालाय,लोक साखरेकडे वळले आहेत .
गूळ
आणि फुटाणे रिकामी पोटी खाल्ल्याने कोणकोणते
फायदे होतात :-
1) गूळ आणि फुटाणे खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ॲनिमिया पासून बचाव होतो.हा आजार जो शक्यतो
स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.या आजाराची लक्षणे म्हणजे थोडं जरी कामकेलं तरी थकवा जाणवतो.
दमल्यासारखं वाटते आणि याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्तआहे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन चे
प्रमाण कमी असते.जे लोक लोहयुक्त आहार कमी घेतात आयर्नअसणारा आहार कमी घेतात त्या लोकांना
ॲनिमिया चा त्रास जाणवतो.पण जर आपल्याला सुद्धा अशी लक्षणे जाणवत असतील तर आपण सुद्धा सकाळी
उठल्यानंतर गूळ आणिफुटाणे नियमितपणे खायला पाहिजेत. कारण गूळ आणि फुटाणे यामध्ये आयर्न असतं.पण
त्याचबरोबरप्रोटीन सुद्धा असतं याचा एकत्रित परिणाम म्हणून तुमच्या शरीरातील आयर्न वाढत,हिमोग्लोबिन चे
प्रमाणवाढते आणि तुमचा ॲनिमिया पासून बचाव होतो.
2) गूळ फुटाणे खाल्ल्याने लठ्ठपणावरती सुद्धा अतिशय गुणकारी आहे कारण गूळ फुटाणे खाल्ल्याने तुमच्या
शरीरातील मेटाबॉलिझम ची प्रक्रिया ही वाढते.चयापचय क्रिया चांगली होते.परिणामी शरीरातील चरबी कमी
होण्यास यामुळे मदत होते आणि लठ्ठपणावरती प्रतिबंध घालता येतो.
3) गूळ आणि फुटाणे मध्ये फायबर चांगला आहे आणि यामुळे आपली पचन संस्था चांगली राहील सेस आणि
एसिडिटी पासून आपला बचाव करायचा असेल तर आपण हे खायला हवे.
4) शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास याचा वापर होतो.जे लोक गूळ आणि चणे याच नियमितपणे
सेवन करतात त्या शरीरातून विषारी पदार्थाचे उत्सर्जन चांगल्या प्रकारे होते आणि परिणामी पिंपल्स येणे या
प्रकारच्या समस्या दूर होतात.त्वचाही तेजस्वी दिसू लागते.एक प्रकारचा ग्लो चेहऱ्यावर निर्माण होतो आणि म्हणूनच
सौंदर्यासाठी आपण गूळ आणि फुटाणे याचे नियमितपणे सेवन करायला हवं.
5) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मित्रांनो फुटाण्यामध्ये बी सिक्स नावाचा व्हिटॅमिन असतो आणि त्यामुळे आपल्या
मेंदूचे पॉवर वाढते,मेंदूची क्षमता वाढते स्मरणशक्ती वाढते. एकदा वाचलेलं बराच काळ लक्षात राहतं आणि म्हणून
ज्यांना बौद्धिक काम जास्त असतात अशा लोकांनी गूळ फुटाने याच नियमितपणे सेवन करायला हवं.
6)
दात मजबूत होण्यासाठी मित्रांनो यामध्ये फॉस्फरस प्रमाण फार जास्त आहे आणि म्हणून
या फरकामुळे
आपले
दात मजबूत होतात.
7) गूळ आणि फुटाणे यामध्ये पोटॅशियम चे प्रमाण चांगले आहे आणि पोटॅशियम हे हृदयाशी संबंधित
काही प्रॉब्लेम्स असतील.हार्ट अटॅक,बीपी असेल तर या प्रॉब्लेम्स वरती पोटॅशियम हे प्रभावी असते आणि म्हणून
गूळ
आणि फुटाणे नियमितपणे खावे यामुळे हार्ट
अटॅक येण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होते.
8) हाडे मजबूत होण्यासाठी सुद्धा हे फार महत्वाचे आहे.गूळ आणि फुटाणे यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात
असते आणि म्हणून आपली हाडे मजबूत होण्यासाठी आपण गूळ आणि फुटाणे नियमितपणे खायला हवेत.
9) ज्या लोकांना वारंवार डिप्रेशन येतं,लहान गोष्टीत ते डिप्रेशन मध्ये जातात,ज्यांचं मन कमकुवत असते अशाने
गूळ फुटाणे नियमितपणे खावे.
10) गूळ आणि फुटाणे यामध्ये अमिनिया एसिड आणि सिरोटोनिन नावाचं द्रव्य असतात
ज्यामुळे लोक नियमितपणे सेवन करतात.त्यांना डिप्रेशन येत नाही,डिप्रेशन पासून त्यांचा बचाव होतो.
गुळ आणि फुटाणे एकत्र खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती
वाढणे, वजन कमी होणे, पचनक्रिया सुधारणे, रक्तदाब नियंत्रणात राहणे, शरीरातील लोहाची
कमतरता दूर होणे वगैरे गोष्टींचा समावेश होतो.
0 Comments: