शारदीय
नवरात्र आणि आयुर्वेद: Shardiya Navratri and Ayurveda
अश्विन
महिन्यात साजर्या होणार्या
या नवरात्रात दुर्गेच्या ९ रुपांचं पूजन
केलं जातं. या नवदुर्गांचा एक
श्लोक आहे
During this Navratri celebrated in the month of Ashwin, 9 forms of
Durga are worshipped. There is a verse of this Nava Durga -
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता: ।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।
या
९ दुर्गा म्हणजेच दुर्गेची ९ रूपे ही
९ औषधी वनस्पतींमध्ये विराजमान
झालेली आहेत. ज्याप्रमाणे ९ देवी आहेत,
त्याप्रमाणेच या ९ वनस्पतींना
वैद्यकीय उपचार पद्धतींच्या नवदुर्गा म्हटलं जातं. ९ दुर्गांची उपासना
मनुष्याची आध्यात्मिक उन्नती करतात तर या औषधी
वनस्पतींच्या रूपातील नवदुर्गा मनुष्याच्या शरीराचं समस्त व्याधींपासून रक्षण करतात.
These 9 Durga i.e. 9 forms of Durga are seated in 9 herbs. As there
are 9 goddesses, these 9 plants are called the Navadurgas of medical treatment.
Worship of 9 durgas gives spiritual upliftment of man while Navadurga in the
form of these medicinal plants protects the human body from all diseases.
मार्कंडेय
वैद्यकीय उपचार पद्धतीत सर्वप्रथम नवदुर्गांच्या या ९ औषधी
स्वरुपांना स्थान दिलं गेलं. ब्रह्मदेवांनी
हे ज्ञान "दुर्गाकवच" रुपात मार्कंडेय ऋषींना दिलं. सर्व प्रकारच्या रोगांवर
रामबाण उपाय असणारी या
औषधी वनस्पती मनुष्याचं रक्षण करतात म्हणजेच एक प्रकारे या
वनस्पती मनुष्यासाठी 'कवच'च आहेत,
त्यामुळे यांना दुर्गाकवच म्हटलं जातं.
These 9 medicinal forms of Navadurga were first given a place in
Markandeya medical treatment system. Lord Brahma gave this knowledge to Sage
Markandeya in the form of "Durga Kavach". These medicinal plants,
which have panacea for all kinds of diseases, protect man, i.e. in a way these
plants are 'shields' for man, hence they are called Durga Kavach.
या
औषधी वनस्पतींमुळे मनुष्य निरोगी दीर्घायुष्य जगू शकतो. मार्कंडेय
पुराणानुसार, या ९ औषधी
वनस्पती निरनिराळ्या रोगांना बरं करत रक्त
शुद्ध करत रक्ताभिसरण नीट
करत मनुष्याला बरं करतो. त्यामुळे
मनुष्याने या वनस्पतींची आराधना
करीत यांचे योग्य प्रमाणात सेवन करायला हवे.
Thanks to these medicinal plants, man can live a healthy long life.
According to the Markandeya Purana, these 9 medicinal plants cure various
diseases, purify the blood and improve the blood circulation. So, man should
worship these plants and consume them in proper quantity.
आता
आयुर्वेदातील या नवदुर्गांबद्दल - Now about these Navadurgas in Ayurveda -
१.
पहिली, शैलपुत्री म्हणजेच हरड किंवा हिरडा
ही वनस्पती - First, Shailaputri i.e. Harad or Harda is a Plant -
पहिली
दुर्गा शैलपुत्री आणि आयुर्वेदात तिचं
रूप हरड या वनस्पतीत
आहे. हिलाच हिमावती असंही म्हणतात. आयुर्वेदात हिचं स्थान महत्त्वाचं
आणि ही वनस्पती ७
प्रकारची आहे. हरीतिका किंवा
हरी ही भय किंवा
भीती घालवते, पथया ही शरीराला
हितकारक आहे, कायस्थ ही
शरीराला सुदृढ करते, अमृता ही अमृतासमान म्हटलेली
आहे, हेमावती ही हिमालयावर असणारी,
चेतकी ही चित्त प्रसन्न
करणारी, श्रेयसी यश देणारी, शिवा
ही कल्याणकारक आहे.
आता यातून शैलपुत्रीची आराधना कशी होईल, तर हिरडा ही वनस्पती औषध म्हणून उपयोगात आणून तुम्ही या दुर्गेची उपासना करू शकता.
The first Durga is Shailaputri and in Ayurveda her form is in the
plant Harad. She is also called Himavati. Its place is important in Ayurveda
and there are 7 types of this plant. Haritika or Hari dispels fear or dread,
Pathaya is beneficial to the body, Kayastha strengthens the body, Amrita is
said to be like Amrita, Hemavati is on the Himalayas, Chetaki is pleasing to
the mind, bestows success, Shiva is beneficent.
Now how will this worship Shailaputri, you can worship this Durga
by using hirda as a herbal medicine.
२.
दुसरी ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी - Brahmacharini i.e., Brahmi -
ही
वनस्पती आयुर्मान वाढवते. हिच्यामुळे स्मरणशक्ती वाढते. ही रक्तदोषांना संपवते
आणि स्वर मधुर करते.
म्हणूनच ब्राह्मीला सरस्वतीही म्हटलं जातं. ही मन आणि
मेंदूला मजबूत करण्याचं काम करते. जठर
आणि लघवी संबंधित व्याधींना
शरीरातून बाहेर टाकते.
This plant increases life span. It increases memory. It removes blood defects and mellows the tone. That is why Brahmi is also called Saraswathi. It works to strengthen the mind and brain. Eliminates stomach and urine related diseases from the body.
३.
चंद्रघंटा म्हणजेच चंद्रशूर किंवा चमसूर - Chandra ghanta means Chandrashur or Chamsur -
ही
वनस्पती कोथिंबिरीसारखी असते. हिच्या पानांची भाजी करतात, जी
खूप पौष्टिक असते. ही वनस्पती लठ्ठपणा
कमी करते, म्हणून हिला चर्महंती असंही
म्हणतात. शक्तिवर्धक, हृदयरोगाला बरं करणारी अशी
ही चंद्रिका वनस्पती आहे.
This plant is like coriander. Its leaves are used as a vegetable, which is very nutritious. This plant reduces obesity; hence it is also called as cherhamanti. Chandrika plant is a tonic and cures heart disease.
४.
कुष्मांडा म्हणजेच कोहळा - Kushmanda means Kohla -
कोहळ्यापासूनच
पेठा ही मिठाई केली
जाते. कोहळा शरीरातील बळ वाढवतो. वीर्य
वाढवतो. रक्ताचे विकार बरे करतो. पोट
साफ ठेवतो. जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या
खचलेली आहे, त्यांच्यासाठी कोहळा
हा अमृतासमान आहे. हा शरीरातील
दोषांना दूर करत हृदयरोग
बरा करतो. पित्ताचा त्रास याने बरा होतो.
Petha is a sweet made from Kohla. Kohl increases the strength of the body. Increases semen. Cures blood disorders. Keeps the stomach clean. For a person who is mentally exhausted, Kohla is like nectar. It cures heart disease by removing the defects in the body. It cures biliousness.
५.
स्कंदमाता म्हणजेच अळशी किंवा जवस
- Skandamata means sloth or linseed -
वात,
पित्त, कफ अशा व्याधींचा
नाश अळशी करते.
Vata, Pitta, Kapha and other ailments are destroyed by sloth.
६.
कात्यायनी म्हणजेच अंबाडी - Katyayani means Flax -
अंबा,
अंबिका, अंबालिका, माचिका अशा वेगवेगळ्या नावांनी
अंबाडी ओळखली जाते. पित्त, कफ तसेच गळ्याचे
आजार यांना बरी करते.
Flax is known by different names like Amba, Ambika, Ambalika, Machika. Cures pitta, kapha and throat diseases.
७.
काळरात्री म्हणजेच नागदवण- Kalratri means Nagdavan-
ही
वनस्पती सर्व प्रकारच्या रोगांचा
नाश करते. मन आणि मेंदूचे
विकार बरे करते. विजयश्री
मिळवून देते. या वनस्पतीची लागवड
घरी करावी. ही वनस्पती घरातील
नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकत घराला सौख्य
मिळवून देते. ही सर्व प्रकारच्या
विषावरही जालिम उपाय आहे.
This plant destroys all kinds of diseases. Cures disorders of mind and brain. Gets Vijayshri. This plant should be cultivated at home. This plant brings peace to the house by removing the negative energy from the house. It is also a powerful remedy for all types of poisons.
८.
महागौरी म्हणजेच तुळस - Mahagauri means basil
तुळस
ही एक सर्वांच्या ओळखीची
औषधी वनस्पती आहे. ही प्रत्येक
घरात लावली जाते. तुळस सात प्रकारची
असते - पांढरी, काळी, मरुता, दवना, कुढेरक, अर्जक, षटपत्र. तुळशीचे हे सर्व प्रकार
रक्त शुद्ध करतात. ही हृदय रोगावर
हितकारक आहे.
Basil is a well-known herb. It is planted in every house. There are seven types of basil - White, Black, Maruta, Davana, Kudherak, Arjak, Shatpatra. All these types of Tulsi purify the blood. It is beneficial for heart disease.
९.
सिद्धिदात्री म्हणजेच शतावरी - Siddhidatri means Asparagus -
हिला
नारायणी असेही म्हणतात. शतावरी वनस्पती बुद्धिबलवर्धक तसेच वीर्यासाठी उत्तम
अशी औषधी वनस्पती आहे.
रक्तविकार तसेच वातपित्त शोधनाशक
आहे. हृदयाला बळ देणारी महाऔषधी
वनस्पती आहे. शतावरी वनस्पतीचे
नियमानुसार सेवन केल्याने सर्व
प्रकारचे कष्ट दूर होतात.
She is also known as Narayani. Asparagus is a herb that is good for the brain and also for sperm. Blood disorders as well as vat pitta are antidote. It is a heart strengthening herb. Consuming Shatavari plant on a regular basis removes all kinds of ailments.
या
आहेत आयुर्वेदाच्या नवदुर्गा. यांचं औषध म्हणून योग्य
प्रमाणात सेवन केल्यास मनुष्य
त्या आजारातून बरा होऊन योग्य
रक्ताभिसरण होत संपूर्ण निरोगी
होतो. असं मार्कंडेय पुराण
सांगतं.
या
आयुर्वेदिक नवदुर्गांची आराधना म्हणजेच या वनस्पतींना औषध
म्हणून स्विकारत त्यांचं सेवन करणे.
अर्थातच
हे सगळं वैद्यांच्या सल्ल्याने
करणे अपेक्षित आहे.
These are the Navadurgas of Ayurveda. If it is consumed in proper quantity
as a medicine, a person gets cured from that disease and becomes completely
healthy with proper blood circulation. This is what the Markandeya Purana says.
Worshiping these Ayurvedic Navadurgas means taking these plants as
medicine and consuming them. Of course, all this is expected to be done with
the advice of a doctor.
!! सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते‼️
0 Comments: